लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया !!!!
झळाळती कोटी ज्योती या – हां – हां हां.
चला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण
नाचती चंद्र तारे वाजती पैंजण
छुन छुन झुम झुम, हां हां.
झोत रुपेरी भूमिवरी, गगनात
धवळली सारी सृष्टी, नाचत डोलत
कणकण उजळीत, हासत हसवीत
करी शिणगार, हां हां.
आनंदून रंगून, विसरुनि देहभान
मोहरली सारी काया हरपली मोहमाया
कुडी चुडी पाजळून प्राणज्योती मेळवून
एक होऊ या, हां हां.
अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस, हीच आहे महाराष्ट्राची ओळख ! कपाळी कुंकू, डोक्यावरती पदर हीच आहे सौभाग्याची ओळख ! सांडलेल्या रक्तात सुद्धा दिसणार नाही काळोख.....! " मराठी" आहोत आम्ही या पेक्षा काय वेगळी असणार आमची ओळख..!
Friday, February 11, 2011
गर्जते मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥
आमच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमच्या लहानग्यात रांगते मराठी
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी
येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळिकळित लाजते मराठी॥
येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी.. स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी.. गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी
Thursday, February 10, 2011

श्रावण- एक आनंदोत्सव
भारतातल्या अठरापगड जातीतल्या प्रत्येक गटाला श्रावण महिना असा अमाप उत्साहाचे उधाण आणणारा असतो. एकात्मता साधणारा एक आनंदोत्सव असतो......
नववधूसारखा जणू हिरवागार शालू नेसलेली धरती, तिच्या अंगावर पिवळ्याधमक ऊन्हाचा झुळझुळीत शेला, शेल्याला इंद्रधनुष्याचा सप्तरंगी काठ, रिमझिमत येणाऱ्या पावसाच्या हलक्या सरींनी तिच्या अंगांगावर रोमांचासारखी फुललेली गवताची कोवळी पाती.... सगळ्या चैतन्याला जणू उधाण येतं आणि "आला श्रावण, आला श्रावण' असा सृष्टीच्या अणूरेणूतून नाद उमटतो.
सृष्टीतला हा उत्सव माणसाच्या मनात भिनत जातो. फुललेल्या मनाची सर्जनशीलता साहित्य, काव्य, नृत्य, नाट्य, चित्र, संगीत अशा निरनिराळ्या कलाविष्काराचं रूप घेते. श्रावण असा निसर्ग आणि मानवाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सम्राट बनतो.
धार्मिक दृष्टीनं श्रावण अत्यंत पवित्र महिना मानला जातो. देवदेवतांच्या पूजा, व्रतवैकल्यं करून भरपूर पुण्यसंचय करून ठेवावा. श्रावणाला शिवमास असंही म्हणतात. कहाण्यांप्रमाणे श्रावणात समुद्रमंथन झालं आणि त्यातून आलेलं हलाहल शंकरानं प्राशन केलं. यासाठी श्रावणी सोमवारी शिवाची पूजा करतात, शिवामूठ वाहतात, उपवास करतात. मंगळवारी नववधू पार्वतीची पूजा करून मंगळागौर साजरी करते. शुक्रवारी जिवतीची पूजा करून आपल्या मुलाबाळांचं संरक्षण करण्यासाठी तिला साकडं घालतात, सवाष्ण जेवायला घालून साखर-दूध फुटाण्याचा प्रसाद वाटला जातो. गुरुवारी गुरुचरित्राचे पाठ. रविवारी आदित्याची पूजा. सत्यनारायणाची पूजा... असा श्रावण आध्यात्मिक दृष्टीनं गजबजलेला महिना असतो.
सणांचा राजा- श्रावण
भारतीय संस्कृतीत सणांचं फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण हा चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाचा महिना. त्यामुळे अनेक सण साजरे केले जातात. निसर्गावर आधारित सणांमध्ये नारळीपौर्णिमा येते. नारळ हा कल्पवृक्ष आणि धार्मिक कार्यात अत्यंत महत्त्वाचा! ओटी भरण्यासाठी, ज्येष्ठांचा सत्कार करण्यासाठी, पूजेमध्ये नारळाचा मान मोठा! या नारळाच्या झाडाविषयी कृतज्ञता म्हणून हा सण. कोळी लोकांना तर या सणांची फार अपूर्वाई असते. त्यांना अन्न देणाऱ्या समुद्राची ते पूजा करतात. त्याला नारळ अर्पण करतात. या आधी चार महिने मासेमारी बंद असते. त्या काळात माशांच्या पिल्लांची वाढ पूर्ण होते. पावसाळ्यात खवळलेला समुद्र आता शांत झालेला असतो. नारळीपौर्णिमेला प्रथम रंगरंगोटी केलेली होडी समुद्रात घालतात.
कृषिप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळे सणांमध्ये शेतकऱ्यांचे उपकारकर्ते नाग आणि बैल यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी आणि बैलपोळासारखे सण साजरे केले जातात. अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांचा नायनाट करणारे नाग, साप यांची पूजा नागपंचमीत केली जाते. बत्तीसशिराळा, भीमाशंकर इथे लाखो नाग-सापांचे प्रदर्शनही भरते. बैलपोळ्याला शेतात वर्षभर काम करणाऱ्या बैलांना झूल घालून, रेश्मी गोंडे, घुंगराच्या माळा, बाशिंगं बांधून सजवलं जातं. पूजा करून गोडधोडाचा घास भरवला जातो.
नातेसंबंधांवर आधारित सणही
राखीपौर्णिमा हा असाच बहीण-भावांचा पवित्र नात्याचे बंध अजून भक्कम करणारा सण श्रावणात येतो. पूर्वी उत्तर भारतात प्रजा राजाला राखी बांधत असे. राजाकडून त्यामुळे संरक्षणाचे आश्वासन मिळे. आज ई-राखीसुद्धा पाठविली जाते. सामाजिक आशयाने पर्यावरण रक्षणासाठी वृक्षांना राखी बांधली जाते. हॉस्पिटल, अनाथाश्रम, कारागृह अपंग वसतिगृह, वृद्धाश्रम इथेही राखीपौर्णिमा मुद्दाम आयोजित करून सामाजिक बांधिलकी व्यक्त केली जाते. मातृदिन हा पिठोरी अमावास्येला साजरा करून मुलांनी आईविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते.
"कृष्ण' हे तर भारतीय संस्कृतीला पडलेलं सुरेख स्वप्न आहे. श्रावणातील अष्टमीला मध्यरात्री कृष्णजन्म झाला. त्यामुळे गोकुळाष्टमी संपूर्ण भारतात फार मोठ्या प्रमाणात साजरी करतात. मथुरा-गोकुळ, वृंदावन, द्वारका इथे तर उत्सवाचा विशेष थाट असतो. कृष्णाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा म्हणजे तरुणाईचा जल्लोष अनुभवायला मिळतो. "गोविंदा आला रे आला'च्या तालावर मानवी थर उभे करून दहीहंडी फोडली जाते.
श्रावणातील वेगवेगळ्या उत्सवात वेगवेगळी पक्वान्नं केली जातात. श्रावणाची सुरवात होते तीच कणकेच्या दिव्याच्या बेताने! नागपंचमीला उकडलेले पुरणाचे दिंड, श्रावणी शुक्रवारी आणि बैल पोळ्याला पुरणपोळ्या, नारळी पौर्णिमेला नारळी भात, नारळाच्या करंज्या खाण्यापिण्याची धमाल असते.
या सर्व उत्सवात काही ना काही कारणाने नाच, गाणी येतातच ! नागपंचमीला स्त्रिया मेंदी काढतात, झोपाळे बांधतात, झिम्मा, फुगड्या असे खेळ रंगतात, मंगळागौरी तर रात्र रात्रभर "खुर्ची का मिर्ची', पिंगा, उखाणे, फुगड्या असे खेळ खेळत जागवतात, नारळी पौर्णिमेला कोळ्यांची नृत्यं, गाणी रंगात येतात. श्रावणावर आधारित अनेक लोकगीतं आपल्याकडे म्हटली जातात. उपशास्त्रीय संगीतातही सावनी, कजरी, झुला यासारखे गायन प्रकार या ऋतूवर आधारित आहेत.
सासुरवाशिणींना श्रावण ही पर्वणी वाटते.
"सावनके झूले' लागले की माहेरी जायला मिळतं. सर्व सणांना शाळांना भरपूर सुट्या म्हणून विद्यार्थी खूष असतात. पूजा, धर्मग्रंथ वाचन, प्रवचन यांनी देवळात भरपूर कार्यक्रम म्हणून ज्येष्ठ मंडळी आनंदात असतात. पौरहित्य करणाऱ्या गुरुजींना भरपूर काम असतं. संगीत, नृत्य क्षेत्रातील कलाकारांना अनेक कार्यक्रम असतात. १५ ऑगस्टसारखा राष्ट्रीय सणही याच महिन्यात येतो म्हणून राजकीय क्षेत्रातही धावपळ असते.
श्रावणी सोमवारचे व्रत
श्रावणी सोमवारच्या व्रतात भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. हे सोमवारचे व्रत तीन प्रकारचे असते. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष. सोमवार व्रताचा विधी सर्व व्रतांत सारखाच असतो. हे व्रत श्रावण महिन्यात सुरू करणे शुभ मानले जाते.
श्रावणी सोमवारचे व्रत सूर्यादयापासून प्रारंभ करून तिसर्या प्रहरापर्यंत केले जाते. शंकराच्या पूजेनंतर सोमवार व्रताची कथा ऐकणे गरजेचे आहे. हे व्रत करणार्याने दिवसातून एकदाच जेवायला हवे.
असे करावे व्रत
श्रावणी सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठावे.
पूर्ण घराची स्वच्छता करावी व स्नान करावे.
गंगा जल वा पवित्र पाणी घरात शिंपडावे.
घरातच किंवा पवित्र ठिकाणी भगवान शिवाची मूर्ती वा चित्र ठेवावे.
पूजेची तयारी झाल्यानंतर खालील मंत्राने संकल्प करा.
'मम क्षेमस्थैर्यविजयारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थं सोमव्रतं करिष्ये'
त्यानंतर खालील मंत्राने ध्यान करा.-
'ध्यायेन्नित्यंमहेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्।
पद्मासीनं समंतात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्॥
ध्यानानंतर 'ऊँ नमः शिवाय' हा मंत्र म्हणून शिव व पार्वतीची षोडषोपचारे पूजा करा.
पूजेनंतर व्रताची कहाणी ऐका.
त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा.
मग भोजन वा फलाहार घ्या.
श्रावणी सोमवार व्रताचे फळ
सोमवारचे हे व्रत नियमितपणे केल्यास भगवान शिव व पार्वतीची कृपा आपल्यावर होते.
जीवनात संपन्नतेचा अनुभव येतो.
सर्व संकटांना भगवान शिव दूर करतात.
शुद्ध, सात्विक, पवित्र श्रावण
हिंदू पंचागाप्रमाणे देवशयनी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. म्हणजे आषाढी ते कार्तिकी एकादशी ह्या चार महिन्यांच्या काळात देव निद्रिस्त असतात, असे मानले जाते. त्यामुळे ह्या काळात पृथ्वीवरील सर्व बर्यावाईट घटनांचा परिणाम मानवावर होत असताना नेहमीप्रमाणे देवाच्या कृपेचे छत्र अखंड रहावे म्हणून या काळात जास्तीत जास्त पूजा-पाठ, जप जाप्य, प्रवचने, कीर्तने, भागवत सप्ताह, पारायणे केली जातात. या योगे देवाच्या कृपेचे छत्र कायम ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. त्यामुळेच या चार महिन्यात तो जास्तीत जास्त सदाचरणी रहाण्याचा प्रयत्न करतो.
या चार महिन्यांपैकी दुसरा येणारा श्रावण हा तर अत्यंत पवित्र महिना मानण्यात येतो. गटारी आमावस्येला मनाचा मलिनपणा गटारात (घाणीत) सोडून द्यायचा असतो आणि दिव्याच्या अवसेला जसे दिवे घासून पुसून स्वच्छ करतात तसेच मनही लख्ख करावे. अशा स्वच्छ आणि स्वात्विक मनाचेच प्रतिबिंब श्रावण महिन्यात पडते. श्रावणी सोमवार, प्रदोष हे सर्व पर्वकाल ह्याच काळात येतात. सर्व देवदेवतांमध्ये श्रेष्ठ असणारा भगवान शिव त्याला प्रसन्न करण्यासाठीच जणू हा महिना आहे असे वाटते म्हणूनच प्रत्येक श्रावणी सोमवारी शंकराला शिवामूठ वाहण्याचा प्रघात आहे.
सोमवारी काय वहाल?
पहिल्या सोमवारी तांदळाची मूठ, दुसर्याला तितीळाची, तिसर्या सोमवारी मुगाची मुठ, चौथ्याला जवस आणि जर पाचवा सोमवार आला तर सातूची मूठ शंकराला अर्पण केली जाते. यात अध्यात्मिक पूजेचे समाधान आहेच, पण पूर्वी आपल्याच शेतात पिकवलेल्या धान्याचा काही भाग देवाची कृतज्ञता म्हणून देवाला अर्पण करण्याची वृत्ती आहे, त्या अर्पिलेल्या धान्यातून ते त्या देवालयाच्या पुजारी, गुरव इत्यादींच्या चरितार्थाचेही साधन होते म्हणून यात मानवताही आहे.
उपासाचा शास्त्रीय अर्थ
याच काळात जास्तीत जास्त उपास असल्याचे कारण देवाच्या सानिध्यात वास करावयाला मिळावा हे आहेच. पण कमीतकमी आहाराने आपला जठराग्नी जो या काळात मंद झालेला असतो त्यालाही जास्त काम करावयास लागू नये हाही त्यामागील शास्त्रीय अर्थ आहे. पावसाळ्यात पचनाच्या तक्रारी वाढतात हवामानामुळे शरीरच्या हालचाली कमी होण्याने तसेच जाठराग्नी प्रदिप्त नसल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण, पावसाचे गढूळ पाणी यामुळे या काळात पोटाचे विकार वाढतात. त्यावर लंघन किंवा अल्प सात्विक आहार हे अत्यंत प्रभावी औषध आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने का होईना, तोंडाचे खाण्याचे काम कमी होऊन ते हरीनामाकडे त्याचा जप करण्याचे काम करू लागते हे काय कमी आहे?
श्रावणातील मंगळागौर
जिभेचे चोचले पुरविण्याचे कमी झाल्यामुळे साहजिकच त्या दिवशी घरच्या गृहिणीलाही थोडा विसावा मिळतो व तिही आपल्या मैत्रिणींसमवेत नटूनथटून देवाच्या पूजेला, मंगळागौरीची पत्री गोळा करायला जाऊ शकते. फुलाची आरास करून प्रसन्न अशा रांगोळ्यांनी वातावरण निर्मिती तर होतेच पण त्यातून तिलाही सृजनाच्या निर्मितीचा आनंद मिळतो व तीही प्रसन्न होते.
मंगळागौरीच्या निमित्ताने सगळ्या माहेरवाशिणी जमतात. यथासांग महादेवाची पूजा करतात व जसा उमेने भोळ्या सांबाला आपल्याशी लग्न करायला प्रवृत्त केले व त्याबरोबर सुखाने कैलासावर राज्य केले तशाच ह्या नवविवाहिता आपल्या पतीसमवेत सुखी संसाराच्या स्वप्नात मग्न होतात.
मोठेपणाचे जोखड काही वेळ बाजूला ठेवून मंगळागौर जागवायला सगळ्याजणी तयार असतात. त्या खेळतात, गाणी म्हणतात फेर धरतात व मनातल्या भावना गीतांतून व्यक्त करून मोकळ्या मनाने पुढच्या दिवसांना, संकटांना सामोर्या जायला सज्ज होतात. अगदी सगळ्या सासुरवाशिणी (वय वाढली तरी) ह्या श्रावणातील सणांची वाट बघत असतात ते गौर जागवणं ते नागपंचमीचे वडाच्या पांख्यांवर घेतलेले उंच उंच झोके, रात्री हातला काढलेली मेंदी अन् त्या प्रत्येकाबरोबर लहानपणीच्या, तरुणपणीच्या सुखद आठवणी.
महागणपती स्तोत्र

श्रीगणेशाय नमः ॥ नारद उवाच ॥
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं ॥
भक्ता व्यासं स्मरे नित्यं आयुःकामार्थसिद्धये ॥१॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ॥
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥
लंबोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ॥
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥३॥
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ॥
एकादशं गणपतिं द्वादशम् तु गजाननं ॥४॥
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य यः पठेन्नरः ॥
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥
विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं ॥
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिन् ॥६॥
जपेद् गणपतिस्तोत्रं षडभिमार्सैः फ़लम् लभेत् ॥
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्र्च लिखित्वा यः समर्पयेत् ॥
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥
इति श्रीनारदपुराणे संकटनाशनस्तोत्रं संपूर्णम् ॥
उकडीचे मोदक

उकडीचे मोदक©
जिन्नस:
२ वाट्या खवलेला ओला नारळ, २ वाट्या चिरलेला गूळ
१ चमचा खसखस
२ वाट्या तांदुळाचे पीठ, २ वाट्या पाणी
२ चमचे तेल, मीठ
उकड मळण्यासाठी तेल व पाणी
साजूक तूप २ चमचे
मार्गदर्शन:
खवलेला ओला नारळ व चिरलेला गूळ एकत्रित करा. मध्यम आचेवर पातेले ठेवून त्यात २ चमचे साजूक तूप घालून एकत्रित केलेले मिश्रण घालून शिजवा. काही वेळाने या मिश्रणाचे सारण बनायला लागते व ते कोरडे पडायला लागते. गॅस बंद करा. सारण शिजत आले की त्यात खसखस भाजून घाला.
मध्यम आचेवर एका पातेल्यात २ वाट्या पाणी तापत ठेवा. त्यात थोडेसे मीठ व २ चमचे तेल घाला. या पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. उकळलेल्या पाण्यात तांदुळाची पीठी घालून कालथ्याने पटापट एकसारखे ढवळा. नंतर परत मंद आचेवर हे पातेले ठेवून त्यावर झाकण ठेवा. एक दणदणीत वाफ येऊ देत. नंतर झाकण काढून ही तयार झालेली उकड एका ताटलीत काढून घ्या व त्यामध्ये पाणी व तेल घालून चांगली मळून घ्या.
उकडीचा साधारण मोठ्या लिंबाएवढा गोळा घेऊन त्याला गोल आकार द्या. पाणी व तेलाचा हात घेऊन हातानेच या गोल आकाराची पातळ, नितळ व खोलगट पारी बनवा. पारीच्या वरच्या कडा जास्त पालळ असायला हव्यात. नंतर या खोलगट पारीमध्ये पूरेसे सारण घालून थोड्या थोड्या अंतरावर पाकळीसारखा आकार द्या. पाकळीचा आकार देताना पारीच्या कडा दोन बोटांच्या चिमटीमध्ये पकडून दाब द्या. हा दाब तसाच पारीच्या खालपर्यंत द्या. अश्या प्रकारे सर्व पाकळ्या अगगद हाताने एकत्रित करून त्याचे मोदकाच्या वर एक टोक बनवा जसा देवळाला कळस असतो तसा.
अश्या प्रकारे सर्व मोदक करून घ्या. चाळणीला तेल लावून मोदक त्यामध्ये घालून कूकरमध्ये उकडून घ्या. कालावधी १५ मिनिटे. जश्या इडल्या उकडतो त्याप्रमाणे.
गरम गरम मोदकांवर साजूक तूप भरपूर प्रमाणात घ्या. चव चांगली लागते. वरील प्रमाणात साधारण १५ ते २० मोदक होतात.
|| तू सुखकर्ता तू दुखहर्ता... तूच कर्ता आणि करविता.... मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया... मोरया मोरया अष्टविनायक मोरया ||
|| ॐ गं गणपतये नम: ||
|| ॐ गं गणपतये नम: ||©
श्री गणपती ही शैव परिवारातील एक प्रमुख देवता आहे. मानवाचे धड आणि हत्तीचे शीर असा हा वैशिष्ट्यपूर्ण देव आहे. प्रथम त्याची गणना शंकराच्या गणांत झाली व पुढे तो शिवगणांचा अधिपती झाला. पुराणात त्याला सुखकर्ता, दु:खहर्ता म्हटले आहे. आद्य शंकराचार्यांनी गणपतीला देव पंचायतनात स्थान दिले. शिव, विष्णु, देवी, सूर्य व गणपती असे पंचायतन बनले. 'कलौ चंडी विनायकौ' म्हणजे, कलीयुगांत चंडी म्हणजे दुर्गा व गणपती या दोनच देवता भक्तांना पावतात. संकट निवारणासाठी भाविक गणपतीची व्रते, पूजा करतात. त्याच उद्देशाने आपणही आज अष्टविनायकांच्या यात्रेला निघालो आहोत. ही यात्रा सर्व भाविकांना गणपतीचा कृपाप्रसाद मिळवून देवो, सर्वांचे जीवन मंगलमय करो ही आमची श्री गजानन चरणी प्रार्थना.
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिध्दीदम
बल्लाळं मुरुडं विनायकं महडम
चिंतामणी स्थेवरम |
लेण्याद्रीं गिरीजात्मकं सुवरदम
विघ्नेश्वरं ओझरम
ग्रामो रांजण संस्थितो गणपति:
कुर्यात सदा मंगलम् ||
णेशमंत्र
अथर्वशीर्षात गणेशाचा मंत्र दिला आहे. "गं" असा तो एकाक्षरी मंत्र आहे. त्याला "बीजमंत्र" म्हणतात. याला "गणपतये नम:" असा नमस्कार जोडून त्याचा जप करतात. अथर्वशीर्षाची एकवीस किंवा सहस्त्र आवर्तने केल्यास संकटनाश होउन कर्त्याला यश व सुख लाभते. चतुर्थी गणपतीला अत्यंत प्रिय आहे. शुक्लपक्षातल्या चतुर्थीला 'विनायकी' आणि कृष्णपक्षातल्या चतुर्थीला 'संकष्टी' म्हणतात. मंगळवारी जी चतुर्थी येते तिला 'अंगारकी' म्हणतात. विनायकीला संपूर्ण रात्र उपवास असतो तर संकष्टीला रात्री चंद्रोदय झाल्यानंतर भोजन करतात. यात भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही प्रमुख तिथी आहे.
गाणपत्य संप्रदाय-गणपती हा ज्यांचा सर्वश्रेष्ठ उपास्य देव आहे असे काही पंथ भारतात निर्माण झाले. असे एकूण सहा संप्रदाय आहेत. महागणाधिपतीचा संप्रदाय, हरिद्रा, उच्छिष्ट, नवनीत, स्वर्ण, संतान ई.
गणेशतत्व
गणपती अथर्वशीर्षात श्री गणेशाला नमस्कार केल्यावर पुढची वाक्ये अशी आहेत, "तू तत्त्व आहेस, तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तू आत्मा आहेस. तू ज्ञानमय आहेस. विज्ञानमय आहेस. तू सर्वकाही आहेस."
ही वाक्ये त्याला ब्रह्मपदी नेऊन बसवतात. गणपती सर्व वाङमयाच्या तळाशी असून नादाच्या मुळाशी आहे. तो मूलाधारचक्रावर अधिष्ठित आहे. वाग्विद्येत तो ओंकाररूप आहे. यावरुन प्रणव उपासना ही गणेशोपासनाच आहे हे ठरते. गणपतीच्या अनेक नावात वक्रतुंड हे एक नाव आहे. वक्र ती माया व तुंड ते ब्रह्म. गणपती हा मायेचा अधिष्ठाता साक्षात परम ईश्वर होय.
श्री गणेशाचे स्वरूप
शिवपुत्र गणेशाला आठ नावे आहेत. प्रत्येक नावाने त्याने दुष्ट दैत्यांचा संहार केला आहे. अथर्वशीर्षात वर्णन केलेले श्री गणेशाचे स्वरूप -
एकदंत चतुर्हस्तं पाशांकुश धारिणम |
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषक ध्वजम ||
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं |
रक्तगंधानुलिप्तागं रक्तपुष्पैही सुपूजीतम ||
अर्थ- गणपती एकदंत आहे. त्याला चार हात आहेत. वरच्या दोन हातात पाश व अंकुश आहेत. खालच्या डाव्या हातात मोडका दात धरलेला असून उजवा हात वरदमुद्रेत आहे. त्याचा ध्वज मूषक चिन्हांकित आहे. तो रक्तवर्ण आहे. तो लंबोदर व शूर्प (सूप) कर्ण आहे. तो रक्तवस्त्र परिधान करतो. त्याच्या अंगाला रक्तचंदनाची उटी आहे. रक्तपुष्पांनी त्याची पूजा होते. रक्तवर्ण अर्थातच लाल रंग.
|| श्रीगणेशार्पणमस्तु ||
श्री गणपती ही शैव परिवारातील एक प्रमुख देवता आहे. मानवाचे धड आणि हत्तीचे शीर असा हा वैशिष्ट्यपूर्ण देव आहे. प्रथम त्याची गणना शंकराच्या गणांत झाली व पुढे तो शिवगणांचा अधिपती झाला. पुराणात त्याला सुखकर्ता, दु:खहर्ता म्हटले आहे. आद्य शंकराचार्यांनी गणपतीला देव पंचायतनात स्थान दिले. शिव, विष्णु, देवी, सूर्य व गणपती असे पंचायतन बनले. 'कलौ चंडी विनायकौ' म्हणजे, कलीयुगांत चंडी म्हणजे दुर्गा व गणपती या दोनच देवता भक्तांना पावतात. संकट निवारणासाठी भाविक गणपतीची व्रते, पूजा करतात. त्याच उद्देशाने आपणही आज अष्टविनायकांच्या यात्रेला निघालो आहोत. ही यात्रा सर्व भाविकांना गणपतीचा कृपाप्रसाद मिळवून देवो, सर्वांचे जीवन मंगलमय करो ही आमची श्री गजानन चरणी प्रार्थना.
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिध्दीदम
बल्लाळं मुरुडं विनायकं महडम
चिंतामणी स्थेवरम |
लेण्याद्रीं गिरीजात्मकं सुवरदम
विघ्नेश्वरं ओझरम
ग्रामो रांजण संस्थितो गणपति:
कुर्यात सदा मंगलम् ||
णेशमंत्र
अथर्वशीर्षात गणेशाचा मंत्र दिला आहे. "गं" असा तो एकाक्षरी मंत्र आहे. त्याला "बीजमंत्र" म्हणतात. याला "गणपतये नम:" असा नमस्कार जोडून त्याचा जप करतात. अथर्वशीर्षाची एकवीस किंवा सहस्त्र आवर्तने केल्यास संकटनाश होउन कर्त्याला यश व सुख लाभते. चतुर्थी गणपतीला अत्यंत प्रिय आहे. शुक्लपक्षातल्या चतुर्थीला 'विनायकी' आणि कृष्णपक्षातल्या चतुर्थीला 'संकष्टी' म्हणतात. मंगळवारी जी चतुर्थी येते तिला 'अंगारकी' म्हणतात. विनायकीला संपूर्ण रात्र उपवास असतो तर संकष्टीला रात्री चंद्रोदय झाल्यानंतर भोजन करतात. यात भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही प्रमुख तिथी आहे.
गाणपत्य संप्रदाय-गणपती हा ज्यांचा सर्वश्रेष्ठ उपास्य देव आहे असे काही पंथ भारतात निर्माण झाले. असे एकूण सहा संप्रदाय आहेत. महागणाधिपतीचा संप्रदाय, हरिद्रा, उच्छिष्ट, नवनीत, स्वर्ण, संतान ई.
गणेशतत्व
गणपती अथर्वशीर्षात श्री गणेशाला नमस्कार केल्यावर पुढची वाक्ये अशी आहेत, "तू तत्त्व आहेस, तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तू आत्मा आहेस. तू ज्ञानमय आहेस. विज्ञानमय आहेस. तू सर्वकाही आहेस."
ही वाक्ये त्याला ब्रह्मपदी नेऊन बसवतात. गणपती सर्व वाङमयाच्या तळाशी असून नादाच्या मुळाशी आहे. तो मूलाधारचक्रावर अधिष्ठित आहे. वाग्विद्येत तो ओंकाररूप आहे. यावरुन प्रणव उपासना ही गणेशोपासनाच आहे हे ठरते. गणपतीच्या अनेक नावात वक्रतुंड हे एक नाव आहे. वक्र ती माया व तुंड ते ब्रह्म. गणपती हा मायेचा अधिष्ठाता साक्षात परम ईश्वर होय.
श्री गणेशाचे स्वरूप
शिवपुत्र गणेशाला आठ नावे आहेत. प्रत्येक नावाने त्याने दुष्ट दैत्यांचा संहार केला आहे. अथर्वशीर्षात वर्णन केलेले श्री गणेशाचे स्वरूप -
एकदंत चतुर्हस्तं पाशांकुश धारिणम |
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषक ध्वजम ||
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं |
रक्तगंधानुलिप्तागं रक्तपुष्पैही सुपूजीतम ||
अर्थ- गणपती एकदंत आहे. त्याला चार हात आहेत. वरच्या दोन हातात पाश व अंकुश आहेत. खालच्या डाव्या हातात मोडका दात धरलेला असून उजवा हात वरदमुद्रेत आहे. त्याचा ध्वज मूषक चिन्हांकित आहे. तो रक्तवर्ण आहे. तो लंबोदर व शूर्प (सूप) कर्ण आहे. तो रक्तवस्त्र परिधान करतो. त्याच्या अंगाला रक्तचंदनाची उटी आहे. रक्तपुष्पांनी त्याची पूजा होते. रक्तवर्ण अर्थातच लाल रंग.
|| श्रीगणेशार्पणमस्तु ||
Subscribe to:
Posts (Atom)
