Friday, March 29, 2013

नातं

डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असाव., हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असाव., मनातून येणा-या आठवणी कोणीतरी समजणारं असाव., जीवनात सुख :दुखात साथ देणारं एक सुंदर नातं असावं....!

Tuesday, March 20, 2012

आई म्हणजे

तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं
तुमच्या जन्मापासून; त्यांच्या मरणापर्यंत, त्यांनी आपल आयुष्य खर्चलेल असतं

आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणार स्टीअरींग असतं
अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं

आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, शिक्षणाचं विद्यापीठ असते
बाप म्हणजे चालती बोलती, अनुभवाची फॅकटरी असते

आई म्हणजे तुमच्या आयुष्यातली, साठवलेली पुण्याई असते
बाप म्हणजे कर्म करून, आयुष्यभर मिळवलेली कमाई असते

आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला, मार्गदर्शक गुरु असतो
दाखवलेल्या वाटेवर, बाप हा जवळचा मित्र असतो

आई म्हणजे साक्षात, भगवंत; परमेश्वर असतो
त्या परमेश्वरापर्यंत, पोचवणारा बाप एक संत असतो

आई म्हणजे; तुमचे शरीर, मेंदू; हृदय; अन् मन असतं
बाप म्हणजे; भक्कम ठेवणारा, पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं

कधीही वेदना झाली कि, तोंडात वाक्य "आई गं SSS” असतं
आणि भले मोठे संकट आले, कि उच्चारात "बाप रे बाप" असतं

परमेश्वर समोर आला तरी, उभे राहायला वीट फेकलेल; पुंडलिकाच मन असतं
त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने; स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं

म्हणूनच म्हणतो, परमेश्वर; अध्यात्म; भगवंत हे सगळ, अजब गणित असतं
त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं, आई-बाप हे कनेक्शन असतं

आई-बाप म्हणजे नकळत मागे असलेली, मायेची सावली असतं
उगाच नाही ते; आपल्या संस्कृतीत, "मातृ देवो भव- पितृ देवो भव" म्हणलेलं असतं

Monday, August 1, 2011

प्रेम जिव्हाळा .....

माझ कुटुंब :- माझ जग , त्याचं प्रेम माझा जिव्हाळा .....

कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.
...
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम.

कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम.

पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.

आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम

कदाचित यालाच म्हणत असावेत प्रेम ....................!!!!!
 

Friday, July 15, 2011

आईपासून दूर गेल्यावर

  || घरापासून दूर || घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे |तुझ्या मायेचा छायेत बिनधास्त होतो, आता राख्राखत उन आहे ||प्रत्येकजन इथे फक्त स्वतःपुरता  विचार करतो |दुसऱ्याचा मनाचा विचार न करता  बेधडक टीका करतो |दूर जाऊन कळले मला हे जग खूप स्वार्थी आहे |घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||.स्वप्नांच्या ह्या नगरीत सगळे लाखोनमध्ये एकटे असतात |स्वतःला पुढे जायचे म्हणून दुसऱ्याला मागे खेचत असतात |मी मात्र प्रतेकाला मदतीचा आधार  देत आहे |घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||ठरवलेले नियम कोणी मनापासून पाळत नाही | शिकण्यासाठी donetion चे रेट कधीच ढळत नाही | भ्रष्टाचाराची  कीड आज चांगुलपणाला पोखरत आहे |घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||खरच वाटत आता तरी मनुष्याने सुधरायला हव |स्वतः साठी थोड, थोड दुसऱ्यांसाठी जगायला हव |निस्वार्थी असा संस्कारांची या जगाला खूप गरज आहे | घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||स्वतःपुरता विचार करण्याचा तसा प्रतेकाला अधिकार आहे |पण दुसऱ्याला मारून जगन, हा कुठल्या जगाचा न्याय आहे?स्वतःपुरत जगुनही दुसऱ्यांना जीवन शिकवायचं आहे  |घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||

Saturday, April 23, 2011

वेडात मराठे वीर दौडले सात !!

“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥
वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥
“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥
- कुसुमाग्रज.