अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस, हीच आहे महाराष्ट्राची ओळख ! कपाळी कुंकू, डोक्यावरती पदर हीच आहे सौभाग्याची ओळख ! सांडलेल्या रक्तात सुद्धा दिसणार नाही काळोख.....! " मराठी" आहोत आम्ही या पेक्षा काय वेगळी असणार आमची ओळख..!
Friday, July 15, 2011
आईपासून दूर गेल्यावर
|| घरापासून दूर || घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे |तुझ्या मायेचा छायेत बिनधास्त होतो, आता राख्राखत उन आहे ||प्रत्येकजन इथे फक्त स्वतःपुरता विचार करतो |दुसऱ्याचा मनाचा विचार न करता बेधडक टीका करतो |दूर जाऊन कळले मला हे जग खूप स्वार्थी आहे |घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||.स्वप्नांच्या ह्या नगरीत सगळे लाखोनमध्ये एकटे असतात |स्वतःला पुढे जायचे म्हणून दुसऱ्याला मागे खेचत असतात |मी मात्र प्रतेकाला मदतीचा आधार देत आहे |घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||ठरवलेले नियम कोणी मनापासून पाळत नाही | शिकण्यासाठी donetion चे रेट कधीच ढळत नाही | भ्रष्टाचाराची कीड आज चांगुलपणाला पोखरत आहे |घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||खरच वाटत आता तरी मनुष्याने सुधरायला हव |स्वतः साठी थोड, थोड दुसऱ्यांसाठी जगायला हव |निस्वार्थी असा संस्कारांची या जगाला खूप गरज आहे | घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||स्वतःपुरता विचार करण्याचा तसा प्रतेकाला अधिकार आहे |पण दुसऱ्याला मारून जगन, हा कुठल्या जगाचा न्याय आहे?स्वतःपुरत जगुनही दुसऱ्यांना जीवन शिकवायचं आहे |घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment