Thursday, October 28, 2010

दोन घडीचा डाव...............

दोन घडीचा डाव,
याला जीवन ऐसे नाव ॥

क्षणिक सुखांना वाव
बाकी नित्य वेदना सराव
तिचा कुणी न उमराव
रंक असे जरी कुणी राव ॥

संथपणास नसे शिरकाव
फ़ुटे उर धावे जो भरधाव
पाहीला संकटी पथराव
सोशीला पराजयाचा घाव ॥

पाही सत्वपरिक्षा साव
तिचा न कधी कुणा लगाव
घेतला नित्य तिचा ठाव
तरी न पाहिला कुणी गाव ॥

करुनी भलती धावाधाव
शोधीला ठेऊनी निरंतर भाव
सुखात स्मरे न कुणी नाव
म्हणे त्यासी दुःखात मला पाव ॥

म्हणेल मुठीत कूणी माव
अगदी खुशाल तीज आजमाव
वल्गना, किती जरी आव
जीवन त्यास केवळ जगून दाव .............

आपल्या प्रेमाचे ना हे आसेच असते ...........

आपल्या प्रेमाचे ना हे आसेच असते

कधी कोणी रूसते,कधी कोणी हसते

दुरून प्रेम किती सुरेख दिसते

हवे हवे वाटणारे सोने असते

प्रेमात सगळ काही नेहेमी खरे नसते

म्हणून कधी तरी ते फसते

पण प्रेम हे जणू नाजुक धार

ज़ोखीमेचा काम त्याला करणे पार

प्रेम हे मधुर सुरांचे गाणे

सर्वानाच आवडते त्यात राहणे

कोणावर तरी मनातून प्रेम करावे

कोणाच्या तरी हृदयात उरावे

कठीण ज़री आहे प्रेमाचा खेळ

करवातो पण किती हृदयांचा मेळ

म्हणूनच हळू हळू का होईना

प्रेमाचा दिशेनी चालत राहायचे असते…..

नशिबाच्या पाऊलवाटा

आठवनिंच्या झोक्यावर आज घेतला मी विसावा
अजूनही शोधाते आहे प्रेमाचा तों हरवलेला ओलावा
आज मज पाशी आहेत अनेक नातिगोती
अजूनही जपून ठेवल्यात मी जुन्या चालीरीती

अजूनही आहे माझा गुलमोहर फुलेला
त्याचा सुगंध मनात खोलवर मुरलेला
मन् तरंगते त्या निळ्या नदीच्या काठी
जिथे कोणीही जीव लावे कोणा साठी

आठवतों प्रेमाचा तों हिरवाकंच गालीचा विणलेला
मुलायम रेशमी धाग्यानी प्रत्येक नात्यात गुंतलेला
एके दिवशी मी परत तिथेच येइन
प्रेमाची ती पालवी परत घेउन जाइन

जीवनाच्या वाटेवर आज मी खुप पुढे आले
आपल्या माणसात असुनही परकी झाले
अजुन खुप चालायचे आहे निरोप घेते मी आता
पहायचे आहे कुठवर नेतात नशिबाच्या पाऊलवाटा

थोडासा थांब

थोडासा थांब
बघ तर मागे वळून
कुठपर्यंत आलेय मी
तुझ्या सोबत तुझ्या नकळत
थोडासा थांब
बघ तर जरा हे डोळे तुझीच वाट बघत आहेत रात्रं दिवस
थकलेत रे ते..
त्याना अलगद एकदा तुझ्या ओठानी पुसून तर जा जरा
थोडासा थांब
तुझ्या नसन्याणे तुझ्या असण्याचे महत्व कळले आहे मला
तुझ असण पुन्हा एकदा देऊन तर जा जरा
थोडासा थांब
तुझ काम, तुझ घर, तुझे मित्र, तुझ विश्व
सगळ सगळ मान्य मला
पण इथे कुणीतरी तुझ्यासाठी एक जग उभ केलय
ते बघून तर जा जरा
थोडासा थांब
ह्या चांदण्या सुद्धा हसतात रे मला
म्हणतात ज्याला तू आमच्यात शोधत असतेस रात्र रात्र
तो ही तुझ्यासाठी झुरतोय का असाच?
त्या चांदण्याना उत्तर देऊन तर जा जरा
थोडासा थांब
आठवण तुलाही येते माझी
पापणी तुझीही ओलावते अश्रुनी
त्या तुझ्या अश्रुना माझ्या ओन्जळीत घेऊ तर दे जरा
थोडासा थांब
तुझ बोलण तुझ हसण तुझा राग तुझ गप्प राहण
घेउन गेलास तुझ्याबरोबर तू सर्व
जगण्यासाठी तेवढच आहे रे माझ्याकडे
माझ जगण मला परत देऊन तर जा जरा
थोडासा थांब
प्रेमात म्हणे न सांगता न बोलता सगळ कळत
मग न सांगता न बोलता
मला समजुन तर घे जरा
थोडासा थांब
माझ्या जवळ थोडासा बस तर जरा
माझा श्वास, माझी सोबत, माझा सहवास
अनुभव तर जरा
थोडासा थांब
माझ्या दिवसात, माझ्या रात्रीत
माझ्या प्रत्येक क्षणात तू आहेस
व्यापून टाकल आहेस तू मला
माझा एक एक क्षण
मला परत देऊन तर जा जरा
थोडासा थांब
तुझ्यात स्वत:लाच कुठेतरी
हरवून बसले आहे मी
जरा येऊन ...माझी मला शोधून तर दे जरा
थोडासा थांब
एकदा, फक्त एकदाच माझ्या मनात डोकवून तर जा
स्वता:लाच बघितल्यावर कस वाटत
ते सांगून तर जा जरा...
थोडासा थांब
अळुवावरच्या थेंबासारखा आहे रे हे आयुष्य... क्षणभंगुर
कुणी ते पान हलवण्या आधी आणि
तो इवलसा थेंब कुठेतरी लुप्ट होण्याआधी
एकदा प्रेम करुन तर जा जरा...
थोडासा थांब
शेवटचा थोडासा थांब
कसलीही अपेक्षा नाही... की कसलेही बंध नकोत
प्रेम केल आहे तुझ्यावर... त्यात कसले व्यवहार नकोत
भावनाच फक्त कळतात रे मला
त्यांच्या पलीकडच काहीही नको
एकदा त्या भावनाना स्पर्शून तर जा जरा
थोडासा थांब
ह्या वेडीला थोडस शहाणपण शिकवून तर जा जरा...
थोडासा थांब

यशस्वी भविष्य

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा. दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, “ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो”. दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, “भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असअतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे!.
.

--
--
-----

चिऊ आणि काऊ

चिऊ आणि काऊ

ती - किती उशीर?
तो - उशीर? मी वेळेवरच आलोय. माझ्या वेळेवर.
ती - मग तुझी वेळ सांगायची की मला. मीही
त्याच वेळेवर आले असते.
तो - बरं.
ती - फक्त बरं?
तो - आता बरं म्हटलं तरी प्रॉब्लेम? मी जर सांगितलं असतं की
ट्रॅफिक खूप होता, किंवा बस उशिरा आली, किंवा बॉसने सोडलाच
नाही, तरीही तुला पटलं नसतं. हो की नाही? म्हणून बरं म्हणालो.
ती - कसला अनरोमँटिक आहेस रे तू?
तो - म्हणजे कसा?
ती - माझ्या मैत्रिणीचा बॉय फ़्रेंड उशीरा आला ना पाच मिनिटं जरी तरी
तिच्यासाठी चॉकलेट्स आणि फुलं आणतो.
तो - डोकं फिरलंय त्याचं?
ती - त्याचं की तुझं?
तो - त्याचंच. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात इतकी साधी गोष्ट कळू
नये त्याला?
ती - हो रे बाबा. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात आणि फुलं देऊन काय खराब
होतं?
तो - नाही.
ती - मग? दोन वर्ष झाली आपण भेटतोय, पण तू मला एकदाही फुलं देऊ नयेस?
अगदीच हा आहेस तू.
तो - हा? मी? अरे चांगला फुलांचा गुच्छ घ्यायचा तर किमान पंचवीस रुपये
लागणार.
ती - इ.... असा कसा रे तू? पंचवीस रुपयात हल्ली
एखादं फुल येतं, गुच्छ नाही.
तो - हो का? मी सकाळी देवाची फुलांची पुडी आणायला जातो ती पांच
रुपयांना पडते. म्हटलं गुच्छ साधारण पांच पट असेल म्हणजे पंचवीस रुपये.
ती - अरे देवा
तो - आणि मी तुला फुलं देणार त्याचा तू दोन मिनिटं वास घेणार,
जमलंच तर एखादं फूल डोक्यात घालणार आणि मग त्यांचं आयुष्य
संपणार. म्हणजे सगळे पैसे फुकट..
त्यापेक्षा आपण एखाद्या हॉटेलात जाऊ, एक साधा डोसा अर्धा
अर्धा खाऊ.. तेवढाच आपल्या डेव्हलपमेंटला हातभार.
ती - बरं
तो - असं काय गं चिऊ. चिडतेस काय?
ती - मग काय? मलाही असं वाटतं की माझ्या
बॉयफ्रेंडने रोमँटिक वागावं.
तो - अगं मला जमत नाही ना. तू मला सांग, पार्काला
पंचवीस फेऱ्या मार, मारीन. सिंहगड दिवसात दोन वेळ
चढून उतर. उतरीन. पण हे फुलं बिलं मला सांगू नकोस हां.
ती - बरं जा पार्काला पंचवीस फेऱ्या मार.
तो - आता?
ती - हं आता.
तो - बरं जातो.
ती - ए काऊ थांब रे.
तो - एकदा म्हणते फेऱ्या मार एकदा म्हणते थांब.
ती - हं. तू ना गाढव आहेस. मी गंमत गेली रे.
तो - बरं तू गाढवी आहेस. अशी गाढवासारखी गंमत
कशी केलीस.. मला वाटलं आता खरंच पंचवीस फेऱ्या.
ती - काऊ तू मला खूप आवडतोस.
तो - मला माहितेय.
ती - काव्या! तुला किती वेळा सांगितलं, मी तू
मला आवडतोस असं म्हटलं की तूही तसंच म्हणायचं.
तो - बरं.
ती - अरे आता म्हण.
तो - चिऊ तू मला खूप..... शी! हे असं कृत्रिम वाटतं.
असं काय सतत आवडतेस आवडतेस करायचं? तुला माहितेय
की तूच मला आवडतेस आणि आणखी कुणी नाही, मग
पुन्हा पुन्हा का बोलायला लावतेस.
ती - असं काय रे काऊ. म्हण ना रे.
तो - बरं.
ती - ...
तो - चिऊ तू मला खूप खूप आवडतेस. इतकी की मला ते तुला कसं सांगावं हेच
सुचत नाही. म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा हे सांगत नाही. आता सुचलंच आहे तर
ऐकून घे.
ती - ऐकलं. काऊ, तूही मला खूप आवडतोस.
तो - चल आता फुलांचे पंचवीस रुपये वाचले त्याचा डोसा खाऊया.
ती - चल.

"आयुष्यावर बोलू काही"

पद्य:
कोमेजून निजलेली एक परी राणी
उतरले तोंड,डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा तरी लोकलची वारी
रोज सकाळीच राजा निघताना बोले
गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परि येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी
खर्‍याखुर्‍या परीसाठी गोष्टीतली परी
मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

गद्य:
ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी


पद्य:
उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हसूनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना...

गद्य:
दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

पद्य:
कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला
आईपरी वेणी फणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची या कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....


गद्य:
बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्‍त,जवळ पहायचंच राहिलं


पद्य:
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय
आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय
नसतो कुठला होमवर्क न असतो कुठला त्रास
ऑफिस मधुन आल्यावर नसतो कुठला क्लास
घरी येउन आरामात टी.व्ही. पहात रहायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...
सगळे असतात फ़्रेंड आणि टिचर कुणीच नसतात
चॉकलेट देणार्‍या काकानां बाबा बॉस म्हणतात
छान छान बॉस कडुन रोज चॉकलेट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...
कॉमप्यूटरवर बसुन कसल काम करतात?
कॉमप्यूटरवर तर नुसतेच गेम असतात
रोज रोज गेम खेळुन टॉप स्कोरर व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...
ऑफिसमध्ये जाउन भरपूर मज्जा करतात
तरीच बरं नसल तरी ऑफिसला जातात
ऑफिसला जाउन मला पण खेळायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...
ऑफिसच्या रिसेस मध्ये हॉटेल मध्ये जातात
हॉटेल मध्ये जाउन मस्त चमचमीत खातात
बरगर, पिज्झा, फ़्राईस आणि आईसफ्रूट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...
महिन्याच्या शेवटी ह्यांना केवढे पैसे मिळतात!
देव जाणो येवढ्या पैशांच हे काय करतात?
मला तर महिन्याला फक्त एकच खेळण घ्यायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...
आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय...
* * * * *

उंदिरमामा उंदिरमामा......

उंदिरमामा उंदिरमामा......नको तिकडे जाऊ
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ

मोठे मोठे पोट त्याचे सुपासारखे कान
हाता एवढे लांब नाक तरी दिसते छान
पोटाला गुदगुदी त्याच्या नको करत राहू
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ

पिवळे पिवळे धोतर त्याच्या पोटावर नाग
मांडीवर चढू नकोस त्याला येईल राग
पायावर उडया सारख्या मारत नको जाऊ
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ

डोक्यावर मुकुट त्यात आहे बघ हीरा
बाप्पा तुला ओरडेल अरे जपून रहा जरा
पाठीमागे त्याच्या नको फिरत राहू
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ

उंदिरमामा उंदिरमामा......नको तिकडे जाऊ
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ

बाप

बाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो
औषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो
पैश्याची जुळवाजुळव करतो
....................तो बाप असतो

सगळ्यांना ने आण करतो
स्वयंपाक हि करतो
सिजरीन नंतर बायकोला त्रास नको ,
म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो
..................................तो बाप असतो

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
................................तो बाप असतो

कॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
...................................तो बाप असतो

स्वतः टपरा mobile वापरून,तुम्हाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
....................................तो बाप असतो

lovemarriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस ऐकल्यावर खूप रडतो
................तो बाप असतो

जाताना पोरगी सासरी,धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
..............तो बाप असतो.

मराठीतूनच बोला सारे

इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल 
मराठी मानसा आता तरी तू मराठीतून बोल...

इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास
पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास...

प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते हेंबाड्या
अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या...

माय झाली मॉम आणि बाप झाला आता डयाड
रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड...

भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका 
मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका...

मराठी इसरत चालल शाळेतले शिक्षण 
मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण...

ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो गुडी पाडवा...

सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी
मराठीतूनच बोला सारे मराठी रक्षणासाठी...!!!

Wednesday, October 27, 2010

ती एकदा आजीला म्हणाली

ती एकदा आजीला म्हणाली
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परक घर आपलं मानायचं?
तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून
तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून
तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ती
त्याचीच बनुन जाते
एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते.
पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं............
salute 2 all women

Thursday, September 30, 2010

आईची माया ............

म्हणतात ना कि देव सर्व ठिकाणी नसू शकतो म्हणूनचं कदाचित त्याने आई हे चरित्र निर्मित केले असावे. यात खरचं काहीचं चूकीचे नाही. फक्त आई म्हणल्यावरचं असं वाटायला लागतं की सर्व चिंता निसरल्या. आईचं काय महत्व असतं हे मला तेव्हा पर्यंत माहित नव्हते जेव्हा पर्यंत मी तिचापासून लांब गेले नव्हते. आणि जरा लांब झाले आणि खरोखर तिचं माया कळून आली.

लांब व्हायचे कारण काय तर लग्न. एक मुलीच्या जीवनातली सर्वात मोठी तडजोड. आम्ही एका गावात असून देखील तिची आठवण आली की मी ढसाढसा रडायची. ती माझ्याहून खूप लांब नव्हती, मला तिला खूप भेटायचं इच्छा देखील होत नव्हते पण तिचा आठवणीत मी खूप रडायचे. कारण मला आता जाणवयाचे की तिचा पूरेपूर साथ आता मिळणे अशक्य. मुली ला सासरी पाठवले की ती त्यांची मुलगी झाली, असे जरी ती म्हणतं असे पण हे देखील तोंडदेखले होतं.

कोणी किती ही प्रेम दिले तरी आईची माया ती आईची चं असते. तिचे ते रागवून जेवू घालणे, आवडीचे नसल्यावर नवं काही बनवून देणे, मैत्रीणिंबरोबर सिनेमाला जाण्यासाठी बाबांची परवानगी मिळवून देणे, काही हट्टं धरल्यास तडजोड करून ही ती वस्तु आणून देणे, प्रेमाने माझ्या जवळ बसून दिवसभरात घडलेल्या तिला बोर वाटतं असल्या तरी सर्व गोष्टी ऐकणे आणि भावाशी भांडण झाल्यास माझा पक्ष मांडणे हे अगदी खरोखर तिला जमायचे. माझा मनातल्या गोष्टी कधीचं तिला सांगण्याची गरज भासलीचं नाही.

आज देखील खरोखर कधी-कधी वाटतं की पळून आई जवळ जावं आणि तिचा मांडीत डोके ठेवून खूप गप्पा माराव्या. आणि तिच्याकडे काही विशेष खाण्याची मागणी करावी. अजून ही मला आईकडून शिकलेले काही पदार्थ बनवले की सर्वांना खूप आवडतात पण मला मनात कुठे तरी खटकतं असतं की नाही गडे यात आईच्या हाथाची मुलीचं चवं आलेली नाही.

अजून ही आठवतं जेव्हा मी आईच्या मनाविरूद्ध वागायचे आणि ती खोटंखोटं का होय ना माझ्याशी नाराज व्हायची तर मी पटकन एखाद्या लहान पोरासारखी तिच्या मांडीवर जाऊन बसायचे आणि जेव्हा पर्यंत ती हसत हसत माझ्याशी बोलायची नाही तेव्हा पर्यंत मी तिला वेडवाकडे तोंड करून हसवण्याचा प्रयत्न करत राहयची. ही लाडी-गोडी जेव्हा मला तिच्याकडून काही मिळवायचे असले की पण चालायची. तिला लगेच कळायचे की आज काय नवीन आता?

हे सगळं आठवलं की असं वाटतं की आता कोणाकडे मी जिद करायची, कोणच्या मांडीवर डोके ठेवून आपल्या मनातल्या गाठी सोडवायच्या, मी चिडल्यावर कोणं आहे मला समझून घेणारे. माझी आई मला नेहमी म्हणायची कगं तुझं सगळ्यांशी पटतं मग काही बिनसलं की तु माझ्या वर का बरं अपला राग काढते?
आणि मी तेव्हां रागात असले तरी तिला नेहमी एकचं उत्तर देयचे.... तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम आणि हक्क आहे ना माझं म्हणूनचं.

आता पुन्हा एकदा आईचे महत्व कितपत आहे ते कळून आले आहे. कारण आता मी देखील या पदावर पोहचली. निश्चितचं हे पाहून माझ्या आईला माझ्यापेक्षा नक्कीचं जास्त आनंद झाले असणार.

आयुष्य म्हणजे ....

आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं

आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

Maut

Maut Se Daar Nahi Lagta Mujhko
Tujh Se Judaai Ka Daar Hain
Kisi Aur Ka Haq Nahi Mujh Pe
Sirf Tujhe Haq Hain
Punch Lo Apni Dhadkano Se
Kitna Pyaar Hain Aapse
Aur Aapko Ham Pe Shaq Hain

Maut

Maut Se Daar Nahi Lagta Mujhko
Tujh Se Judaai Ka Daar Hain
Kisi Aur Ka Haq Nahi Mujh Pe
Sirf Tujhe Haq Hain
Punch Lo Apni Dhadkano Se
Kitna Pyaar Hain Aapse
Aur Aapko Ham Pe Shaq Hain

Bewafai

Kuch To Baat Hai Jo Aap Hamse Kahe Nahi Sakte,
Kuch To Dard Hai Jo Ap Sahai Nahi Sakte,
Hamein Itna Dur Kar Diya,
Jo Ye Bate Hamse Kar Bhi Nahi Sakte.


Mohabbat Se Hamain Kya Umeed Hoti Hai,
Mohabbat To Beumeed Hoti Hai,
Chahate Hai Jine Hum Jaan Se Bhi Zyada,
Bewafai Unhi Se To Naseeb Hoti Hai.

Wednesday, September 29, 2010

लहानपण दे देवा

आईची अंगाई, काउ चिऊ चा घास हवा
मोठे नाही व्हायचे मला लहानपण दे देवा

casual/ sick लीव्ह नको मला, उन्हाळ्याची सुट्टी हवी
performance presentation नको मला तोंडी परीक्षा हवी
chinese / thai नको मला मऊ भात हवा
मोठे नाही व्हायचे मला लहानपण दे देवा

मोठा flat नको मला रेतीत किल्ला बांधायचा आहे
मोटर गाड़ी नको मला तीन चाकी सायकल हवी आहे
कोट टाय नको मला अर्धी विजार हाफ शर्ट हवा
मोठे नाही व्हायचे मला लहानपण दे देवा

club, pub नाही मला बागेत जायचे आहे
बग्गीजम्पिंग नाही मला घसरगुंडीवर खेलायचे आहे
pepsi / sprite नको मला बर्फाचा गोला हवा
मोठे नाही व्हायचे मला लहानपण दे देवा

रोज संध्याकाळी मी शुभंकरोती म्हानिन
आई बाबांना नमस्कार करून पाढे सुद्धा लिहिन
शहन्या मुला सारखे मोठ्यंचे ऐकिन
तुझ्या कडून मला फक्त एक आशीर्वाद हवा
मोठे नाही व्हायचे मला लहानपण दे देवा ...........

तुझी आठवण

life

Sunday, April 18, 2010

ती माझी आई

ती माझी आई

पदर कसून ती स्वार स्कूटरवर
पाठी तिच्या मी मजेत निर्भीड
काय कशाची कसली चिंता
सोबत माझी आई असता

चाकोरीच्या पुढती जाऊनी
शिकवी आम्हा छंद नवे
खेळ नवे अन काम नवे हे
यापरी अजूनी काय हवे

सळसळता उत्साह तिचा हा
देई आम्हा स्फूर्ती नवी
नाही दिसली कधीच थकली
आई माझी सदा नवी

थोरांमधे नाही रमली
बालांमधे बाल मात्र ती
बालजनांचा मेळावा हा
वागवीत ती सदा भोवती

मऊ भातावर धार तुपाची
खमंग पिठले, चटणी जराशी
अजब तृप्त ती करुन आम्हा
देई तिची ऊबदार कुशी

देणारा हा हात तिचा तो
कधी न पसरला कुणापुढे
प्रत्येकाला हात मदतीचा
देण्या ती हो सदा धडपडे

थकली आता जरी जराशी
चाल मंदही झाली खाशी
तरुणाईला लाजवणारी
हीच असे आई माझी

मुलांवरी या उधळूनी जीवन
विसरुन जाऊन दु:ख उरातून
जीवनसाथी नसतासोबत
तयार केले आम्हा घडवून

सदा हसतमुख असणारी ती
उतारवयी हळवी होई
बांधलेल्या वास्तूचा हा
कळस पाहूनी तॄप्त होई

घाव उराचे झाकून ठेवून
जीवन पुढती चाले जी
स्वयंसिद्धा अन आत्माभिमानी
हिच असे माझी आई
हिच असे माझी आई

माझ्या आईवर लिहिलेली ही माझी कविता. पण ह्याच्या पेक्षाही खूप मोठीये माझी आई

Thursday, April 15, 2010

ती माझी आई

मराठी मुलगी

College मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.

College मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.

College मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.

College मधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते

कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते

शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते

हॅपी मदर्स डे ... "आई''ची ममा झाली

"पोळी''च्या ऐवजी मुलं "मॅगी'' चाखू लागली
पिझ्झा, मॅकरोनी, मिरींडा मागू लागली
आईचा वेश बदलला
आईची भाषाही बदलली
ती सरळ कामावरच जाऊ लागली
नोकरी-करिअरमध्ये चमकू लागली
स्मार्ट बनली, कॉन्फिडन्ट झाली
जेवताना निरनिराळ्या विषयांवर स्वतंत्र मतं मांडू लागली
स्वयंपाकाची फार आवड नसताना केवळ मुलांसाठी म्हणून
वेगवेगळे पदार्थ करू लागली
कितीही मॉडर्न झाली तरी आईचं ह्रदय मुलांसाठी तुटणं काही थांबलं नाही. मुलांसाठी वेळप्रसंगी स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून "ममा'' तिचं "आई''चं काम करत राहिली...जगातलं सर्वोत्तम ते माझ्या मुलांना मिळावं यासाठी प्रयत्न करत राहिली.

प्रत्येकाच्या मनात आईची एक निराळीच जागा असते नाही ! आपल्या आयुष्यात एकटं वाटावं असे प्रसंग जेव्हा येतात तेव्हा हक्काची आई आहेच हे पुरतं माहीत असतं. ती म्हणाली "सगळ ठीक होईल'', की सगळं ठीक होणार असं वाटू लागतं...नव्हे तसं ते होतंच.

आता आईचं मुलांशी असलेलं नातंही किती छान-मोकळं होऊ लागलंय. एक तर आईला स्व'भेट होऊ लागलीय. त्यामुळे मुलांना प्रेमाच्या तुरुंगात न ठेवता, ती स्वतः बहरत मुलांनाही फुलू देते.

लहान असताना सारखी आई लागते, मग टीनएजमध्ये ती म्हणेल त्याच्या विरुद्ध करणं बरोबर वाटतं...हळूहळू नात्यात परिपक्वता येते...आणि आई-मुला-मुलीचं नातं बहरू लागतं.

रोजच्या धबडग्यात आपल्याला फार काही करता येत नाही तसं - आईसाठी खास असं...पण १० मेच्या मदर्स डे`च्या निमित्तानं का होईना ममासाठी काही करावं का? तिला थोडी स्पेस मिळावी म्हणून? म्हणजे तसं मदर्स डे'चं कारण हवंच हे सारं करायला असं नाही...पण...काय हरकत आहे?

तुम्ही तिला काय भेट देणार? आवडीचं पुस्तक? की खूप दिवसांपासून हवी असलेली सीडी?

की झक्कपैकी बाहेर जेवायला घेऊन जाणार? अर्थात स्वतःच्या हातानं काही करून खाऊ घातलंत तरी खूष होईल बरं ममा !

तुम्ही कामात खूप व्यस्त असाल तर तिच्यासाठी म्हणजे इतर काही न करता खास तिच्यासाठी पाच मिनिटं राखून ठेवलीत तरी खूष होईल ती...आणि तुम्हालाही आईबरोबरचे ते क्षण जपून ठेवावेसे वाटतील.

खरं तर आपण हे नातं फार गृहीत धरतो...आई - ती तर आहेच काहीही झालं तरी...ती कधी आजारी पडू शकते, तिला कधी एकटं वाटू शकतं, तिला कधी कंटाळा येऊ शकतो, तिच्या पूर्ण न झालेल्या स्वप्नानं तिच्या डोळ्यात पाणी येऊ शकतं याचं भान नाही राहात आपल्याला...

Wednesday, April 14, 2010

माझे मरण

माझे मरण
होता श्वासात तेव्हा,
नव्हत कोणी डोकावून बघायला,
आज जेव्हा श्वासच उरला नाही,
तेव्हा आले सगळे बघायला,

नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर,
तेव्हा, नव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन,
तर, आले सगळे टाहो फोडायला,

आज पहा माझा काय थाट!
लोक जमतील मला अंघोळ घालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड,
आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,

जेव्हा उपाशी होतो रात्रों-रात्र,
नव्हत कोणी एक घास खाऊ घालायला,
आज जेव्हा भुक मेली माझ्याच बरोबर माझी,
ठेवलाय माझ्यासाठी त्यांनी भात शिजायला,

जन्मभर लाथा मारून गेले जे मला,
आज आले माझ्या पाया पडायला,
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी,
आज चौघे-चौघे आले मला धरायला,

आज काय किम्मत 'त्या' रडण्याला?,
आज काय किम्मत 'त्या' छाताड झोडण्याला?,
ज्या घरात रहातच नाही आज कोणी,
आज काय किम्मत 'ती' घरपूजा करण्याला?

Tuesday, April 13, 2010

लग्नानंतर बघा कशी ही Life घेते पूर्ण Twist

लग्नानंतर बघा कशी ही Life घेते पूर्ण Twist
कवितेच्याही वाहित सापडते, या महिन्याची किराणा लिस्ट..

लग्नानंतर रोज ऐकणे, "तू पूर्वीसारखा राहिला नाही"
तूही होतीस पूर्वीच सुंदर, फरक तिने हा पहिला नाही

सायंकाळी नियम्बद्धाशी, न चुकाणारी रोजची कटकट
दुर्लक्षितशी सुरु राहते, अखंड, अनंत सदैव वटवट

टोमणे झाले मित्र मला, घराणे झाले शिव्यान्ना जागा
उद्धरले तू सर्व कुळान्ना, अखेरीस मी तुलाच त्रागा...

नेहमीच माझी सत्व परीक्षा, परस्त्रीवरुनी अन् ऑफिसमध्ये
कोण राम अन कोण ही सीता, रामच जळतो अग्निमध्ये....

तूच म्हणाली कर ना कविता, सख्या कधी तू माझ्या वर..
म्हणुन सांगतो ऐक प्रिये... आणि "जा चहा कर...!!!!"

कवी : अद्न्यात